“शाब्बास अकॅडमी ” शिक्षण, स्पर्धा आणि सर्जनशीलतेचा संगम.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचे आमचे ध्येय. यूपीएससी, एमपीएससी तसेच सर्व शासकीय अधिकारी बनण्यासाठीच्या स्पर्धा परीक्षांची इयत्ता पहिली पासून तयारी करणारा दर्जेदार ऑनलाइन प्लॅटफॉर्म.

“वाचा, शिका आणि पुढे चला!” शिक्षण व स्पर्धा परीक्षांवरील लेख वाचा!
नवीन शैक्षणिक धोरणं, अभ्यास टिप्स, आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती - सगळं काही एकाच ठिकाणी! आमच्या ब्लॉग विभागात दर आठवड्याला नवे लेख प्रकाशित होतात.

“शिका, स्पर्धा करा आणि चमका!” शिकण्यातून स्पर्धेकडे तुमच्या यशाची सुरुवात!
शाब्बास टॅलेंट सर्च परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमतांनुसार विविध स्पर्धा आणि करिअरच्या संधींची ओळख करून दिली जाते. या विभागातून विद्यार्थी आत्मविश्वास, ज्ञान आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करतात. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

आमची ओळख
“शिक्षणातून व्यक्तिमत्त्व घडवणारी विश्वासार्ह डिजिटल अकॅडमी.”
आमचं ध्येय - “शिकणं आनंददायी बनवणं आणि प्रत्येक विद्यार्थ्यामधील सुप्त क्षमता उजळवणं.”
शाब्बास ॲकॅडमी ही पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधारित शिक्षण देणारी एक सर्वसमावेशक डिजिटल शिक्षणसंस्था आहे.
आम्ही प्रत्येक मुलामधील वेगळेपण आणि कौशल्य ओळखून, त्याला योग्य दिशेने विकसित करण्यावर विश्वास ठेवतो. आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थी मजेशीर पद्धतीने शिकतात, परीक्षा देतात आणि स्वतःच्या प्रगतीचा मागोवा ठेवतात.
शिक्षणाला ताणमुक्त आणि प्रेरणादायी बनवणं — जेणेकरून विद्यार्थी फक्त गुणांसाठी नाही तर ज्ञानासाठी शिकतील.
आमची वैशिष्ट्ये
स्पर्धा विभाग

ग्रुप डान्स कॉम्पिटिशन

इनोव्हेटिव्ह Teaching कॉम्पिटिशन

गोष्ट सांगणे स्पर्धा
प्रश्नमंजुषा
महापुरुषांच्या प्रेरणादायी कार्यातून आणि शालेय विषयांतून घ्या ज्ञानाची नवी दिशा.

विद्यार्थी दिन प्रश्नमंजुषा

बालदिन प्रश्नमंजुषा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सावित्रीबाई जोतीराव फुले

इयत्ता १ ली साठी

इयत्ता २ री साठी

इयत्ता ३ री साठी

इयत्ता ४ थी साठी

इयत्ता ५ वी साठी

इयत्ता ६ वी साठी

इयत्ता ७ वी साठी

इयत्ता ८ वी साठी
शाब्बास टॅलेंट सर्च एक्झामिनेशन
शिक्षण घेऊन करिअर करण्यापेक्षा, करिअर निवडण्याची संधी शिक्षणातूनच उपलब्ध करून देणे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लहान वयातच त्यांच्या आवडी, क्षमतांनुसार विविध स्पर्धा परीक्षांची ओळख आणि तयारी मिळते.

प्रेरणादायी दृष्टिकोन
इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी आणि इतर शासकीय स्पर्धा परीक्षा यांचा प्राथमिक परिचय मिळावा, ही या उपक्रमाची खासियत आहे.

शिक्षणातून करिअर निवड
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेल्या अंतर्गत क्षमता (innate talent) ओळखून त्यांना योग्य दिशेने करिअर निवडता यावे, यासाठी ही परीक्षा सहाय्यक ठरेल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण अनुरूप रचना
शिक्षणात विचारशक्ती, समस्यासमाधान, संवादकौशल्य, आणि सर्जनशीलता यावर भर देणारी परीक्षापद्धती.

डिजिटल परीक्षा प्रणाली:
सर्व परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेतल्या जातील — सुरक्षित, पारदर्शक आणि विद्यार्थ्याभिमुख पद्धतीने.

प्रत्येक विद्यार्थ्याला संधी
शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल.

राज्यस्तरीय गौरव
प्रत्येक श्रेणीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गौरवचिन्ह आणि “शाब्बास स्टार” पदवी प्रदान केली जाईल.
